आज दी अठावीस ऑगस्ट रोजी सांय पाच वाजता माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील दिगाव येथे मंसूर शाह वली बाबा यांच्या आशीर्वाद ग्रुपाच्या वतीने जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने माशीरचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात भव्य कुस्त्यांचा अखाडा रंगला होता, ज्यामध्ये जिल्ह्यासह परराज्यातील नामांकित मल्लांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.पुर्णा नदीच्या काठी वसलेले हे छोटेसे दिगाव कुस्ती क्षेत्रातील समृद्ध वारशासाठी ओळखले जाते. पूर्वी दिगावच्या मल्लांनी राज्यभर आपली धाक निर्माण केली होती.