चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीची अशोक लेलँड घेऊन निघालेल्या चालकाने समोरून वेगात येणाऱ्या इको मोटर चालकास गाडी हळू चालव असे सांगितले. या किरकोळ कारणावरून एको मोटारीतील दोघांनी लेलँड कंपनीची गाडी चालवणाऱ्या चालकास दगड गोट्यांनी जबरदस्त मारहाण केली. सदरची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावच्या हद्दीत घडली आहे.