माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये चक्क कोरे कागद अर्जदाराला दिले. हा अजब गजब प्रकार बाभूळगाव नगर पंचायतमध्ये घडला. मुख्याधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या या प्रतापामुळे हैराण झालेल्या अर्जदार तथा माजी उपनगराध्यक्ष रविंद्र काळे यांनी या संबंधीची तक्रार थेट राज्य माहिती आयोग व वरीष्ठ कार्यालयात केली आहे.