शासनाकडून गरिबांसाठी शिवभोजन योजना राबविली जात आहे. त्यानुसार दुपारी १२ ते ३ या वेळेत येणाऱ्या गरीबांना मध्यान्ह भोजनाचे वाटप केले जाते. त्यामुळे पोटासाठी भ्रांत असलेल्यांना अन्नाचा लाभ मिळत आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्यामुळे दोन केंद्रे बंद झाले आहे. त्यामुळे गोरगरिबांचे पोट कसे भरणार, असा सवाल केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने