आठ जानेवारीला दुपारी तीन वाजता च्या सुमारास गुलाब भजन कर वय 53 वर्ष त्यांच्यासोबत महादेव सहारे वय 45 वर्ष हे दोघेही दुचाकीने पोलीस ठाणे कळमना हद्दीतील चिखली पुलावरून जात असताना त्यांना ट्रक चालक कुलेश्वर निसार याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून मागून धडक दिली. ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रोशन आदमने यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास कळमना पोलीस करीत आहे.