जालना येथील एसीबीने छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस कर्मचार्यावर कारवाई करुन त्याला लाच घेतांना रंगेहात पकडले असल्याची माहिती सोमवार दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दिली. एमआयडीसी सीडीको पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हैदर अब्दुल खलील शेख याने तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यात बी फायनल करण्यासाठी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयाची लाच मागीतली होती.परंतु,त्यावर तडजोड करुन 20 हजार देण्याचे ठरले.शिवाय ठरलेल लाचेच्या रकमेतून 10 हजार रुपये नगद दिले.