पुसद तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘विद्यार्थी संवाद दौरा’ झाला . या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले. या दौऱ्यात शाळा, महाविद्यालये तसेच वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मूलभूत सोयीसुविधा आणि इतर अडचणी जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे नानवटकर यांनी सांगितले.