दारव्हा-तळेगाव हा आठ किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजीअभावी खड्डेमय झाला आहे. वारंवार तक्रारी, निवेदने करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने नागरिक व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांची शक्यता वाढली होती त्यामुळे तळेगाव, घाटकिन्ही, हनुमाननगर, घनापूर, मानकी, फुबगाव या परिसरातील नागरिक, ऑटो चालक व बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दी. १ सप्टेंबरला दु. १ वा.खड्डे बुजवले आणि निषेध म्हणून त्यात बेशरमाची झाडे लावली.