इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सव जश्न ए ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने शुक्रवार दि. 5 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता पासून जामा मज्जिद तहसील कार्यालय रामटेक येथून काढण्यात आला. डीजेच्या तालावर हा जुलूस साई मंदिर, हिरवा तलाव, समर्थ विद्यालय, बस स्टँड चौक, डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक होत शास्त्री चौक, शीतला माता मंदिर, पापधुपेश्वर वार्ड, शास्त्री चौक, तहसील कार्यालय मार्गाने पुन्हा जामा मशजीद रामटेक येथे पोहोचला. येथे जुलूसचे दू. 1 वा समापन करण्यात आले.