आज दि ३० ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीजवळील नेवपुर मध्यम प्रकल्प भरून ओव्हरफ्लो झाला असून धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकल्पाच्या मध्यभागी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखेडे यांच्या हस्ते बोटीवरून जलपूजन करण्यात आले.