पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे सदर अपघात दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी जेबीएम कंपनी जवळ महाळुंगे येथे घडला आहे. अनिस वाजिदअली अहमद असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे समीर अनिस अहमद यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.