पोलिस अंमलदाराच्या अंगावर सत्तूरने वार करणार्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. खराबवाडी (ता. खेड) गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ ही घटना घडली.दीपक अशोक जंगले (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. पोलिस अंमलदार शिवाजी वसंत मरकड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.