शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात एका विवाहितेच्या तक्रारीवरून पती व सासऱ्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ३० वर्षीय महिलेचा विवाह आरोपी आनंद प्रफुल्न बरडे (वय ३२) यांच्याशी हिंदू रीतीरिवाजाने झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेले; परंतु त्यानंतर आरोपी पती दारू पिऊन घरी येत असे. कोणतेही कारण नसताना तो शिवीगाळ करून मारहाण करीत असे. पतीसोबत कायम वाद घडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या छळाबाबत सासरे प्रफुल्