अमरावती शहरात जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला असून, आतापर्यंत २८९६ अपात्र लोकांना दिलेली जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. एकूण ४६३८ अर्ज आले होते, त्यापैकी १६४ अर्जाची तपासणी करण्यात आली. ५३ लोकांच्या आधार कार्डवरील जन्मतारीख आणि शपथपत्र व अर्जातील जन्मतारीख यात तफावत आढळली. यापैकी ३५ लोकांच्या आधार कार्डवर जन्मतारीख १ जानेवारी (1/1) असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता सांगितले.