एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने पारधी विकास योजनेंतर्गत वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या पारधी समाजातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य देण्याकरिता अर्ज मागविण्यात आले होते. सदर योजनेसाठी अर्ज पुनश्च अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.