बाभूळगाव शहरातील शिवछत्रपती चौकातील रस्त्यावर बांधलेल्या सिमेंट नालीवरील रपटा खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहे. येथील नागरिकांनी वारंवार नगरपंचायतला सांगितल्यावरही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. वारंवार दुचाकी चार चाकी वाहणांची चाके या खड्ड्यामध्ये अडकून अपघात होत आहे. त्यामुळे अनेक दुचाकी स्वारांना किरकोळ दुखापती सुद्धा झाले आहे.त्यामुळे या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.