मुस्लिम बांधवांसाठी एक पवित्र आणि महत्त्वाचा दिवस असलेल्या ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास मुंब्रा येथे भव्य जुलूसचे आयोजन करण्यात आले होते. पैगंबर मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या जुलूसमध्ये केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर इतर धर्मांच्या लोकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. अमृत नगर परिसरातून या जुलूसला सुरुवात झाली.