धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील 366 गावे व पारधी बेड्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या मास्टर ट्रेनरची कार्यशाळा दिनदयाल प्रबोधिनी निळोणा येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेवटच्या आदिवासी व्यक्तीपर्यंत विभागाच्या योजना पोहचावा, असे कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक वुईके यांनी सांगितले.