गोळीबाराच्या घटनेने टेंभुर्णी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. मंगळवारी (दि.९) रात्री कलाकेंद्रात अज्ञात कारणाने तरुणांच्या दोन गटामध्ये भांडण झाले. त्यातून बाचाबाची झाली. याचे रुपांतर मोठ्या भांडणात झाल्याने एकाने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरने जबर गोळीबार केला. यामध्ये पंढरपूरजवळील वाखरी येथील देवा कोठावळे (वय-३२) हा एक गोळी मांडीत घुसून तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.