राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात रविवार दिनांक 24 ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता पर्यंत आयोजित संवाद कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्रासह अन्य ठिकाणाहून आलेल्या नागरिकांच्या समस्या, तक्रार,निवेदन, स्नेहभेट स्वीकारून सर्वांचे समाधान करण्यात आले. अनेकांनी राज्यमंत्री जैस्वाल यांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तर काही लाडक्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन ही केले.