गौरी गणपती उत्सवानिमित्त गावाकडे येणाऱ्या नागरिकांची गर्दी व गौरी म्हणजेच महालक्ष्मीच्या पूजन नंतर पुणे येथे जाणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता खाजगी बस वाहतूक चालकांनी वाशिम पुणे बसचे सरासरी 700 ते 1000 रुपये असलेला दर जवळपास दुप्पट म्हणजेच दीड हजार ते दोन हजार रुपये केल्यामुळे सामान्य नागरिकांची अडचण झाली. यामुळे वाशिम येथून दि. 2 सप्टेंबर रोजी रात्री 10 वा. पुणे येथे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला प्रचंड गर्दी दिसून आले. यामध्ये अनेक प्रवाशांनी पुण्याकडे उभे राहून प्रवास केला.