पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत जुन्या बोगद्याजवळ रिक्षा व मोटारीच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील दोन मुलांचा मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले असून, जखमींवर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अहमद रजा शेख (वय ११) आणि उबेद रजा शेख (वय ८) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलांचे नावे आहेत.