गणेशोत्सवादरम्यान मराठा मोर्चाबद्दल आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास गुरुराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी लाखो भाविक मुंबईत येतात. जर मराठा मोर्चा याच दिवशी आला तर त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होऊ शकते आणि पोलिसांवर मोठा दबाव येऊ शकतो. वैयक्तिकरित्या, मी मनोज जरांगे यांना तारखेचा पुनर्विचार करण्याची विनंती करेन.