२६ ऑगस्टला झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदीनाल्या काठावरील शेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपासी, तुर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे या आसमानी संकटामुळे शेतकरी हादरुन गेले आहे.झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम संबंधित महसूल विभागाकडून करण्यात आले असून झालेल्या नुकसानाची तात्काळ मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी ताडगाव येथिल माजी सरपंच विनायक श्रीरामे यांनी प्रशासनाकडे केली आहे.