ओबीसी उपसमिती बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाले होते, सरकारने काढलेल्या जीआरमधील मराठा शब्दावर आक्षेप घेत त्यांनी बैठकीत आपली भूमिका मांडली. मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसीला फटका बसतोय, असे भुजबळ यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं. तर, ओबीसी उपसमितीला सदस्य मंत्री उपस्थित होते, बैठकीत आमची विस्तृत चर्चा झाली.