बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे दि.6 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसावी.