महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत सण 2025 मध्ये 10 कोटी वृक्ष लागवडीचे भव्य उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीला 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. या अनुषंगाने ता. 26 ऑगस्ट मंगळवारी दुपारी 2 वाजता बाजार समितीच्या सिंदी येथील मुख्यालयातील दुय्यम आवारात 75 वृक्ष व उपशाखा सेलू येथील कापूस बाजार आवारात 100 वृक्षांची लागवड करण्यात आली.