सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुटा आणि चिंतरेवला नदी घाटांवरून रेती वाहून नेण्यासाठी सिरोंचा कालेश्वर मार्गावर दोन्ही बाजुला ट्रकांची रांग लागत असल्याने या मार्गावर अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र याकडे स्थानीक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सिरोंचा कालेश्वर मार्गावर रोजच 50 ते 60 ट्रकांच्या रांगा दिसून येत आहेत. दोन्ही बाजूने ट्रकांच्या रांगा राहत असल्याने अन्य वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.