आचोळे येथे तलावात बुडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरतकुमार मिस्त्री हे दृष्टीहीन असून आचोळे तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी नेहमीप्रमाणे गेले होते. तलावनजीकची संरक्षक जाळी तुटल्याने त्यांना अंदाज मिस्त्री यांना आला नाही आणि तलावात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची नोंद आचोळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.