विरार येथील विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट मारुतीचा काही भाग उसळल्याने भीषण दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगार्यात अनेक कुटुंबे गाडली गेली. ढिगार्याखाली दबल्या गेलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 32 तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व महापालिकेच्या अग्निशमनदालाकडून बचाव कार्य सुरू आहे.