शिर्डी साईनगरीत महिला साईभक्ताचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.स्थानिकांच्या सतर्कतेने तात्काळ चोरट्याला पकडून बेदम चोप दिला.चेन्नई येथील महिला भाविकाचे दागिने चोरताना साईभक्त महिलाही जखमी झाल्यात. या घटनेने साईभक्तांच्या सुरक्षेवर प्रशचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.