काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहितीच्या आधारे काल सापळा रचून देशी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी दारू, भट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य, कच्चा माल तसेच तयार दारू जप्त करण्यात आली आहे.