आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास गायमुख चौकी येथे मल्टी-एक्सल ट्रक बंद पडला असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. ट्रक बंद पडल्यामुळे माल पलटी होण्याची शक्यता आहे. सध्या माल खाली करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.