आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ताडाचीवाडी, ता. खानापूर येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दाजी शेठ पवार, सरपंच सौ. काजल सागर पवार, उपसरपंच श्री. सचिन धोंडीराम पडळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश पाटील, तसेच लक्ष्मण सरगर, धनराज पवार, विकास पवार, रणजीत पवार, जितेंद्र पडळकर, महादेव पडळकर, करण जाधव यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.