दहेगाव ग्रामपंचायतीत उघडकीस आलेल्या रेशन कार्ड केवायसी फसवणूक प्रकरणानंतर तात्काळ दखल घेत कळमेश्वर तालुक्यातील सर्व गावांमध्ये रेशन कार्ड केवायसी मोहीम पूर्णपणे मोफत राबविण्याचे आदेश माननीय तहसीलदार साहेबांनी दिले. तसेच या प्रकारामध्ये दोषींवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मंगेश भाऊ गमे यांनी तहसीलदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.