नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा आज दुपारी मुंबई येथील सामना कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश संपन्न झाला. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.