नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या कर्मचाऱ्याच्या दोन मुलीना आमदार समीर मेघे यांच्याकडून आर्थिक मदत करयात आली. वडगाव येथील नंदवर्थन हरबा शेंडे ड्युटीवर जाताना अचानक नाल्यातील पाणी पातळी वाढली. पाण्याचा जोर इतका होता की, पाण्याच्याप्रवाहासोबत ते वाहून गेले. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. आईवडिलांना गमावलेल्या निधी (वय १५) व सिध्दी (वय १२) या अल्पवयीन बहिणी पोरक्या झाल्या. आभाळ कोसळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.