चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स, 32 एएनएम, 22 एमपीडब्लु, 170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर, टायर, भंगारातील वस्तु, डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहु नये यांची काळजी घेण्याचा इशारा दिला जात आहे.