दहिसर (पूर्व) येथील जनकल्याण नगरमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीची आमदार मनीषा चौधरी यांनी रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पाहणी केली. फायर ब्रिगेड, पोलीस आणि रहिवाशांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आमदार चौधरी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली आणि आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले. भाजपचे कार्यकर्ते मदतीसाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.