पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीतील न्यू ताज नगर येथे राहणारा कुख्यात आरोपी जॉर्ज अँथोनी फ्रान्सिस विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारची गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून देखील त्याच्या अपराधी कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरून आरोपीला पोलीस आयुक्त यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित करण्यात आले.