डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील भीमबाण परिसरात सूर्य नदीत बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या शांताराम चौरे यांना नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही व ते पाण्यात बुडाले. पोलिसांमार्फत मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली एक दिवसानंतर मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.