हिंगणघाट तालुक्यातील धोची शिवारात शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल पुरुषोत्तम सराटे वय 38, जात गोंड, रा. धोची असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अनिल सराटे शेतात जात असताना गावातील अमोल मानकर यांना भेटले. त्यावेळी त्यांनी "शेतीचे खूप कर्ज झाले आहे, त्यामुळे बरं वाटत नाही" असे सांगून शेताच्या दिशेने निघून गेले होते.