येत्या १४ सप्टेंबर रोजी सातारा शहरात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनला विरोध दर्शवत ऑल इंडिया पँथर सेनेने रस्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे शनिवारी दुपारी 1 वाजता दिला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्यराव गायकवाड यांनी सांगितले की रविवार हा सातारा शहरातील पारंपरिक बाजार दिवस असून या दिवशी शेतकरी बांधव विविध कृषी उत्पादने, दूध, भाजीपाला विक्रीसाठी येतात. मॅरेथॉनमुळे सकाळी पाच ते अकरा या वेळेत वाहतुकीत बदल करण्यात आल्याने शेतकरी, विक्रेते व नागरिक त्रस्त होतील.