रस्त्याने पायदळ घराकडे जात असलेल्या व्यक्तीस एकाने पाठीमागून येत हाता बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना ता. 8 सोमवारला दुपारी 1.30 वाजता तालुक्यातील मोही येथे घडली. याप्रकरणी राहुल शिवरामजी बोंदाडे वय 46 रा. मोही यांनी दुपारी 4.15 वाजता सुरज बाबाराव भगत याचे विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.