नागपूर रेल्वे स्थानकावर हमसफर एक्सप्रेसच्या छतावर एक तरुण चढला. यावेळी त्याला हाय टेन्शन वायरचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला हा सर्व थरार प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रवाशांनी अनुभवला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरून पुणे हमसफर एक्सप्रेस जात असताना या एक्सप्रेस वर हा तरुण चढला. दरम्यान प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी त्याला खाली उतरण्यासाठी आवाज देऊ लागले.