पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहनांसाठी नवीन एमएच ०६ सीयु नोंदणी मालिकेची सुरुवात करण्यात आली असून, आकर्षक व पसंतीचे क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी दुचाकी व चारचाकी परिवहन वाहनांच्या अर्जदारांना विहित शुल्कापेक्षा तीनपट शुल्क भरून अर्ज करता येणार आहे, तर चारचाकी खासगी वाहनांसाठी नियमित शुल्क आकारण्यात येणार आहे. अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने आज शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास दिली.