चाळीसगाव : दिनांक ८ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय येथे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, आणि हत्तीरोग यांसारख्या किटकजन्य आजारांवर तसेच जलजन्य आजार व इतर साथीच्या आजारांवर आणि एचआयव्ही एड्सवर एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जनजागृती करण्यासाठी "डंक छोटा, धोका मोठा" आणि "येता कण कण तापाची, करा तपासणी रक्ताची" अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले