मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील 27 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या मोर्चात लाखोंचा जनसागर सहभागी होणार आहे.या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामस्थांनी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. आज सोमवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गावकऱ्यांनी मिळून तब्बल 20 क्विंटल तिखट पुरी बनविण्याचे काम सुरू केले आहे. ही संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था पिंपळगाव येथील सर्व गावकरी मंडळींनी एकत्र येऊन केली आहे.