जाधववाडी फलटण येथील राहत्या घराशेजारी लावलेल्या ट्रॅक्टरमधील टुलकिल जॅक टेपरेकॉर्डर व साऊंड असा ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार घडलाय. फलटण शहर पोलीसांनी रविवारी सांगितले की जाधववाडी फलटण येथे हर्षद गजानन जाधव यांनी राहत्या घराशेजारी ट्रॅक्टर लावला होता. ११ सप्टेंबरला मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर (क्रमांक एम एच ११ सीक्यू ९७२८) मधील टुलकिल जॅक टेपरेकॉर्डर व साऊंड असा ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेलाय.