सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू नेतृत्व, वधुरंदर व झुंजार कामगारनेते श्रीशैल भैय्या गायकवाड व त्यांचे सहकारी भाई राजा सोनकांबळे यांनी आंबेडकर भवन, दादर मुंबई येथे रिपब्लिकन सेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे युवा नेतृत्व अमन आंबेडकर, प्रदेश सचिव विनोद काळे, जिल्हा प्रभारी तथा महाराष्ट्र राज्य नेते सिद्राम उर्फ सिद्धार्थ कांबळे यांची उपस्थिती होती.